Ashadhi Vari : मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत चरणसेवा उपक्रमांचे आयोजन; वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा

0
Ashadhi Vari : मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत चरणसेवा उपक्रमांचे आयोजन; वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा
Ashadhi Vari : मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत चरणसेवा उपक्रमांचे आयोजन; वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा

Ashadhi Vari : नगर : आषाढी वारीतील वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पी. व्ही. बेल्हेकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नेवासा तसेच सुप्रसाद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, कोळपेवाडी यांच्या माध्यमातून उस्थल दुमाला आणि पोहेगाव येथे चरणसेवा व मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

नक्की वाचा : साकुरी येथे खरीप पीक विमा २०२६ योजनेचा प्रारंभ; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला लाभ

पायांना औषधी तेलाने मसाज

वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी आयुर्वेदिक औषधी तेलाच्या साहाय्याने चरणसेवा करण्यात आली. पायांना औषधी तेलाने मसाज केल्यामुळे दीर्घ पायी प्रवासामुळे आलेला ताण व थकवा कमी होण्यास मदत झाली. चरणसेवेसोबतच वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यक औषधांचे मोफत वाटप, प्रथमोपचार सेवा तसेच विविध आरोग्यविषयक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची देऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांचा सहभाग (Ashadhi Vari)

दोन्ही उपक्रमांमध्ये संबंधित आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकऱ्यांना आपुलकीने, तत्परतेने आणि सेवाभावाने चरणसेवा व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.