Ashok Bank : सीए असलो तरी अशोक बँकेत नापास झालो : मुरकुटे

आरबीआयचे निर्बंध सहा महिन्यात समाप्त होतील

0
Ashok Bank : सीए असलो तरी अशोक बँकेत नापास झालो : मुरकुटे
Ashok Bank : सीए असलो तरी अशोक बँकेत नापास झालो : मुरकुटे

Ashok Bank : श्रीरामपूर : अशोक बॅंकेबाबत (Ashok Bank) काही ठेवीदारांनी आरबीआय कडे तक्रारी केल्या. काहींनी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या.त्यामुळे 28 तारखेच्या सायंकाळपासून आरबीआयने (RBI) बँकेवर निर्बंध लावले असून त्यामुळे बँकेचे व्यवहार सध्या बंद राहणार असले तरी पाच लाख रुपये ठेवी असणाऱ्यांना तीन महिन्यात व त्या पुढच्या रकमा असणाऱ्यांना सहा महिन्यात सर्व पैसे परत मिळतील. वसुलीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मी सीए असलो तरी अशोक बँकेच्या कारभारात मात्र नापास झालो असे मत बँकेचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

नक्की वाचा : शहरात वाहनांच्या काचांना सर्रास काळी फिल्म; नियम मोडणाऱ्यांना कुणाचे अभय

मुरकुटे यांनी घेतली पत्रकार परिषद

अशोक बँकेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याने बँकेवर आरबीआय ने बंधन लावले आहे.ही वार्तासर्वत्र पसरल्यानंतर आज बँकेमध्ये ठेवीदारांची मोठी गर्दी उसळली होती. या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. गेल्या काही दिवसापासून बँकेबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्याने ठेवीदारांमध्ये गैरसमज निर्माण झाला. निश्चितपणे ठेवीदारांचे कष्टाचे पैसे आहेत आणि ते त्यांना परत देणे ही आमची जबाबदारी आहे. परंतु मागील काही काळामध्ये वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे माझे बँकेकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीला व्यक्तीशः मी स्वतः आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहोत. यात संचालक मंडळाचा कोणताही दोष नाही असेही ते म्हणाले.

अफवांमुळे करंट, सेविंग आणि पिग्मी अकाउंट चे पैसे काढायला गर्दी उसळली. त्यामुळे बँकेची तरलता डिस्टर्ब झाली.काहींनी आरबीआय कडे तक्रारी केल्या. त्यामुळे बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. मुदत ठेवीच्या पावत्या मोठ्या प्रमाणात आहेत. प्रीमॅच्युअर्ड त्या देता येत नाही असे ही ते म्हणाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वेळेवर पैसे न भरल्याने थकबाकी (Ashok Bank)

बँकेमध्ये 384 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वितरण मात्र 423 कोटींचे झाले आहे .त्यामुळे सिडी रेशोमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. कर्जदारांनी वेळेवर पैसे न भरल्याने थकबाकी वाढली. त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर झाला आहे .लोकांचे कष्टाचे पैसे असतात. त्यामुळे ते घाबरणे साहजिक आहे. अफवा पसरल्याने गर्दी झाली आहे.लोक एकदम पैसे घ्यायला आले. त्याचाही परिणाम झाला. आरबीआय ने सहा महिन्यांचे बंधन घातले आहे ही एक सामान्य बाब आहे.जिल्ह्यातील इतर बँकांवर देखील यापूर्वी अशी बंधने लावण्यात आली होती, मात्र ती सुरळीत झाली. अशोक बँक सुद्धा सहा महिन्यांमध्ये पूर्व पदावर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वसुली नियमित चालू राहणार

पाच लाख रुपयापर्यंतचे ठेवींना विमा संरक्षण असल्याने नव्वद दिवसाच्या आत व्याजा सकट ते पैसे परत दिले जाणार आहेत तसेच पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी या सहा महिन्यात परत देणार आहोत. वसुली नियमित चालू राहणार असून वसूल झालेली रक्कम बँकेत जमा होणार आहे. ती ठेवीदारांना देण्यात येणार आहे. बँकेवर निर्बंध लागलेले असले तरी बँकेचा परवाना रद्द झालेला नाही. सहकार खात्याचे नियमानुसार दोन ठिकाणी चेअरमन राहता येत नसल्याने मला बँकेचे चेअरमन पद सोडावे लागले आणि येथेच गफलत झाली .बँकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कामकाज केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे .

मी कंजूसपणा करतो तो सभासदांना भावतो: भानुदास मुरकुटे

नगर आणि पुणे येथील कर्जदार सभासदांची संख्या मोठी असून नगरमध्ये दीडशे कोटीचे तर पुण्यामध्ये तीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. वसुलीसाठी बँकेने संबंधित सभासदांना नोटीस पाठवल्या असून वसुलीची प्रक्रिया पद्धत चुकीची असल्याने वेळखाऊ असल्याने त्याला वेळ लागत आहे . कर्जदारांना जप्तीच्या नोटीस दिल्याने ते नाराज झाले. काही लोकांनी गावात नकारात्मक चर्चा केली. आर्थिक दृष्ट्या मी खूप काळजीपूर्वक कारभार करीत असतो. मी कंजूसपणा करतो तो सभासदांना भावतो आणि म्हणून त्या विश्वासावर लोकांनी या बँकेत ठेवी ठेवलेले आहेत. परंतु कर्जवाटप ज्यादा झाल्याने व वसूल कमी झाल्याने बँक थोडी अडचणीत आहे. मात्र सहा महिन्यांमध्ये सर्व परिस्थिती सुरळीत होईल. तोपर्यंत सर्व सभासद ठेवीदार कर्जदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी अशोक बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.