Assault : तलावातील पाणीउपशाची तक्रार केल्याने मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Assault : तलावातील पाणीउपशाची तक्रार केल्याने मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Assault : तलावातील पाणीउपशाची तक्रार केल्याने मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Assault : तलावातील पाणीउपशाची तक्रार केल्याने मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Assault : नगर : दुष्काळी परिस्थितीत पिंपळगाव माळवी तलावातील (Pimpalgaon Malvi Lake) पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून गोरक्षनाथ भाऊसाहेब आढाव (रा. पिंपळगाव माळवी) यांच्यावर गावातील काही व्यक्तींनी हल्ला केल्याची (Assault) घटना घडली आहे. या हल्ल्यात आढाव जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तलावातून दररोज रात्री मोटारी लावून पाण्याचा उपसा

मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव माळवी तलावातील पाण्याचा उपसा करू नये, याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, या आदेशाला हरताळ फासत तलावातून दररोज रात्री मोठ्या प्रमाणात मोटारी लावून पाण्याचा उपसा केला जात असल्याचा आरोप आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गावातील काही व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याचे समोर (Assault)

या प्रकाराची दखल घेत आढाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित शासकीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या होत्या. याच तक्रारींचा राग मनात धरून १० नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास गावातील काही व्यक्तींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. जखमी आढाव यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.