Assault on a Young Man : नगर : अहिल्यानगर शहरातील काटवणं खंडोबा (Katvan Khandoba) परिसरात युवकाला मारहाण केल्याची (Assault on a Young Man) घटना उघडकीस आली असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) पाच जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत मुन्ना गणी पठाण (वय ३५, रा. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सीराज पठाण व इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास काटकण खंडोबा, महात्मा फुले वसाहत परिसरात घडली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लाथाबुक्यांनी मारहाण करून केले जखमी (Assault on a Young Man)
फिर्यादी आपल्या लहान मुलांना भेटण्यासाठी सासरवाडीत गेले असता संशयित आरोपींना त्याचा राग आला. यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत “येथे का आला” असा जाब विचारला. त्यानंतर वाद वाढत जाऊन संशयित आरोपींनी कोणत्यातरी टोकदार वस्तूने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादीला जखमी केले. तसेच पुन्हा येथे आल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



