ATM Break-in Case | एटीएम फोडल्या प्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीचे गळ्यावर ब्लेडने वार

0

ATM Break-in Case | पारनेर : पारनेर (Parner) जेलमध्ये निघोज येथील एटीएम फोडल्या प्रकरणी (ATM Break-in Case) न्यायालयीन कोठडीत असणारा अटकेत असलेला परप्रांतीय आरोपी संदीप भजन सिंग याने स्वतः गळ्यावर ब्लेडने वार केले असल्याची घटना सोमवारी (ता. १३) सकाळी ११.१५ च्या सुमारास घडली.

हे वाचा – महिलांच्या सुरक्षेसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ ठरतेय मोठा आधार; केंद्राच्या माध्यमातून १ हजार ४११ महिलांना मिळाली मदत

जखमा खोलवर नाहीत (ATM Break-in Case)

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेत या आरोपीने स्वतःच्या हाताने ब्लेड सारख्या धारदार शस्त्राने ७ ते ८ वार केले असून जखमा खोलवर नसल्याने या आरोपींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारांनी दिली. तर सोमवारी दुपारी वैद्यकीय उपचार करून या आरोपीची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

अवश्य वाचा – रुपाली चाकणकरांच्या बहिणीने सर्व आरोप फेटाळले; ‘ती’ खाती बनावट असल्याचे स्पष्टीकरण

न्यायालयीन कोठडीत असताना (ATM Break-in Case)

पारनेर तालुक्यातील निघोज येथील बसस्थानक परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम शनिवारी (ता. २१) रात्री ते पहाटे दरम्यान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता परंतु तो अपयशी ठरला होता.परंतु ४ दिवसांत तांत्रिक माहिती आधारे पारनेर पोलिसांनी या एटीएम फोडी प्रकरणी संदीप भजन सिंग (वय २२, मूळ रा. महालेवाला, जि. फिरोजपूर, राज्य  पंजाब, हल्ली रा. निघोज ता. पारनेर जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी २३ मार्च रोजी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद संकेत वैद्य यांनी दिली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता तो न्यायालयीन कोठडीत असताना हा प्रकार घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here