
Attack on journalist : नगर : वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुशिल थोरात (Sushil Thorat) यांच्यावर १० ते १२ जणांनी हल्ला (Attack) केल्याची घटना गुरुवारी (ता.२०) सायंकाळी पाइपलाइन रस्त्यावर (Pipeline Road) घडली. या हल्ल्यात थोरात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नक्की वाचा : कौठेमलकापूरच्या प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्पाला विरोध
वादाचे रूपांतर मारहाणीत
प्राथमिक माहितीनुसार, वाहनाच्या धक्क्यावरून थोरात यांचा काही जणांशी वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यांच्यासह १० ते १२ जणांनी थोरात यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हल्ल्यात सहभागी व्यक्तींबाबत माहिती घेण्यास सुरुवात (Attack on journalist)
घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.


