Bail Rejected : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला

तडजोडीचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठी चपराक

0
Bail Rejected : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला
Bail Rejected : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला

Bail Rejected : पारनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bail Rejected) यांचा सोशल मीडियावर अवमान करणाऱ्या मंगेश बेकारसे (Mangesh Bekarse) या समाजकंटकाला न्यायालयाने (Court) जामीन नाकारला असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संविधानप्रेमी आणि आंबेडकरी जनतेच्या एकजुटीचा मोठा विजय झाला आहे.

नक्की वाचा : ठाकरेंशी पुन्हा गद्दारी! भाऊसाहेब वाकचौरे शिंदेंच्या तंबूत दाखल होणार…?

संथ कारवाईमुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष

काही दिवसांपूर्वी मंगेश बेकारसे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून अवमान केला होता. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः पारनेर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ३० मे रोजी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या सुरुवातीच्या संथ कारवाईमुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.आरोपीच्या अटकेसाठी ८ जून रोजी पारनेर पोलीस ठाण्यावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, काही तथाकथित पुढाऱ्यांनी पडद्यामागून आरोपीशी तडजोड करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रामाणिक आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. या तडजोडीच्या प्रकाराला कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. ११ जून रोजी झालेल्या बैठकीत, आरोपीच्या अटकेसाठी १८ जून रोजी ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आणि तसे निवेदन पोलिसांना देण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तडजोडीचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठी चपराक (Bail Rejected)

जनतेचा वाढता रोष आणि आंदोलनाची तीव्रता पाहून पोलीस प्रशासन सक्रिय झाले. १५ जून रोजी पोलिसांनी बेकारसेला अटक केली. त्यानंतर १६ जून रोजी आरोपीच्या वकिलाने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.या विजयामुळे तडजोडीचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. “बाबासाहेबांचा अपमान आणि स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर आणि आरोपीचा जामीन फेटाळला गेल्यामुळे, नियोजित ‘जेलभरो’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. राजेंद्र करंदीकर यांनी या लढ्यात सहभागी असलेल्या सर्व प्रामाणिक भीमसैनिकांचे आभार मानले असून, “सत्य परेशान होऊ शकते, पण पराजित नाही,” अशी भावना व्यक्त केली आहे.