Bail Rejected : भोंदू गडगेचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला; सहकाऱ्यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

0
Bail Rejected : भोंदू गडगेचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला; सहकाऱ्यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव
Bail Rejected : भोंदू गडगेचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला; सहकाऱ्यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

Bail Rejected : नगर : वडगाव पान येथील भोंदू राजेंद्र गडगे व मधुकर शिंदे या दोघांना काल (ता. १३) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला. दरम्यान, याप्रकरणातील फरार आरोपी डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे व सुरेश शिंदे यांनीही अटकपूर्वक जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या दोन्ही प्रकरणात आता २० मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अंनिसच्या सचिव अॅड. रंजना गंवादे यांनी दिली.

हेही वाचा : पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

जामीनासाठी प्रयत्नशील

भोंदू गडगे व त्याचा सहकारी मधुकर शिंदे हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भोंदू गडगेचे वकीलही त्याच्या जामीनासाठी प्रयत्नशील आहेत. गडगेला २० मे रोजी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे.

नक्की पहा : साखर निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या; किसान सभेची मागणी

पुढील सुनावणी (Bail Rejected)

दरम्यान भोंदू गडगेचे तिघे सहकारी डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्-वरी गडगे व सुरेश शिंदे यांनी अटकपूर्वक जामीनासाठी वकीलामार्फत कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर देखील दि. २० मे रोजी सुनावणी होणार आहे.