फ्लेक्स लावायचे काम प्रांताधिकार्यांचे नसते, त्यांचे गुलाम होता का; माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रशासनावर नाराज
Balasaheb Thorat : संगमनेर : तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती (Drought Situation), विजेचा झालेल्या खेळ खंडोबा आणि डोळ्यादेखत तालुक्यातून वाहून चाललेले हक्काचे पाणी मिळावे याकरता आज हजारो शेतकरी नागरिक व महिला यांनी रस्त्यावर येत भव्य जन आक्रोश मोर्चा केला. या जन आक्रोश मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी हे राजकीय दबावातून उपस्थित न राहिल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या भूमिके विरोधात तीव्र घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त करून प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना शांत करून काँग्रेस पक्षाचे (Congress Party) नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व मान्यवरांनी प्रांत कार्यालयाच्या पायऱ्यांवरती ठिय्या ही आंदोलन केले.
संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित
जन आक्रोश मोर्चा हजारोंच्या संख्येने प्रांत कार्यालयावर दाखल झाला. खरे तर या मोर्चामध्ये माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, अमोल शेरकर यांच्यासह संगमनेर तालुक्यातील शिखर संस्थांचे पदाधिकारी हे उपस्थित होते. अशावेळी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी अरुण मुंडे यांनी उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेतकरी संकटात असताना अधिकारी मस्तीत (Balasaheb Thorat)
कारण या मोर्चा बाबत चार दिवसापूर्वी त्यांना सविस्तर निवेदन देऊन मोर्चाची माहिती देण्यात आली होती. तरीही प्रशासन उदामपणे वागले. शेतकरी संकटात असताना अधिकारी मस्तीत वागले. याचा संताप निर्माण झाला. ऑक्टोबर हिट मध्ये सूर्य तळपत असताना हजारो शेतकरी व महिला रस्त्यावर बसून होत्या अशा परिस्थितीमध्ये अधिकारी मात्र निर्धावलेल्या परिस्थितीत होते.
संगमनेर तालुक्यातील प्रशासन व अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करत असून संगमनेर तालुक्यातील नागरिकांशी अत्यंत हिनेतेने वागत आहे. याची वारंवार प्रचिती नागरिकांना आली आहे. आणि आज तर या अधिकाऱ्यांनी कहर केला यामुळे सर्व नागरिक संतप्त झाले.
हजारो शेतकरी पुन्हा तळपत आहेत अशावेळी प्रांताधिकारी कार्यालय निवेदन स्वीकारायला यावे अशी मागणी डॉ जयश्रीताई थोरात यांनी केली. प्रांताधिकारी अरुण उंडे हे निवेदन स्वीकारण्यासाठी येत नाहीत हे पाहून डॉक्टर जयश्रीताई थोरात चांगल्याच संतापल्या.
यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रांत अधिकारी उंडे हे येत नाही यावरून शेतकरी खूप आक्रमक झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक समीर बारवकर वीज वितरणाचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. निवेदन स्वीकारायला या या मागणीनंतर शेतकरी आक्रमक होताच त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाचे गेट ओलांडून आत मध्ये प्रवेश केला. शेतकऱ्यांचा संताप पाहून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्व शेतकरी व युवकांना शांत केले व यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरती सर्व पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
शेतकरी मागे हटायला तयार नाही हे पाहून प्रशासनाने आपली भूमिका बदलली व त्यानंतर प्रांताधिकारी अरुण उंडे हे निवेदन स्वीकारण्यासाठी यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भावनांमध्ये आले. यानंतर मोर्चाच्या ठिकाणी येऊन त्यांनी निवेदन स्वीकारले. संतप्त शेतकऱ्यांनी अनेक सवाल केले.



