Rajyasabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, १२ जागांसाठी निवडणूक, भाजपचे आठ खासदार होणार निवृत्त

0
Rajyasabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, १२ जागांसाठी निवडणूक, भाजपचे आठ खासदार होणार निवृत्त

नगर : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीनंतर आता राज्यसभेच्या (Rajyasabha Election) एकूण १२ जागांवर निवडणूक (Election for 12 seats) होणार आहे. यात उत्तर प्रदेशातील एकूण १० जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या या १२ जागांसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान (Voting on October 16) होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे.

नक्की वाचा : श्रीरामपूरच्या ‘रणरागिणी’ आईचे धाडस, लेकासाठी बिबट्याशी थेट भिडली!

भाजपचे आठ खासदार होणार निवृत्त (Rajyasabha Election)

उत्तराखंड राज्यातील एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. कारण उत्तराखंडमधून भाजपचे नरेश बन्सल निवृत्त होणार आहे. या व्यक्तीरिक्त टीएमसी खासदार रुक्मिणी मलिक यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालच्या एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ११ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा २५ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यात भाजपचे ८ खासदार तर प्रत्येकी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या एका खासदाराचा समावेश आहे. भाजपचे नरेश बन्सल, बृजलाल, समी द्विवेदी, चंद्रप्रभात, हरदीप सिंह पुरी, नीरज शेखर, अरुण सिंह, बीएल वर्मा यांचा कार्यकाळ संपत आहे. समाजवादीचे राम गोपाल यादव आणि बसपाचे खासदार रामजी निवृत होत आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. यानंतर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हा ६ ऑक्टोबर तर ९ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. या निवडणुकीत १६ ऑक्टोबरला सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले. तर त्याच दिवशी मतमोजणी होईल.

अवश्य वाचा : लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

२८ विधानपरिषदेच्या जागांवर निवडणुक (Rajyasabha Election)

२८ विधानपरिषदेच्या जागांवर निवडणुककेंद्रीय निवडणूक आयोगाने चार राज्यातील २८ विधानपरिषदेच्या जागांवरही निवडणुकीची घोषणा केली आहे. यात उत्तर प्रदेशातील ११ जागा, बिहारच्या ८, महाराष्ट्रातील ५, कर्नाटकातील ४ जागांचा समावेश आहे. अशा एकूण २८ जागांवर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ४ पर्यंत मतदान होईल. तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, संबंधित विभागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात कोणत्या पक्षाकडून कोणाला कोणत्या जागेवर उमेदवारी मिळते, हेच आता पाहावं लागणार आहे.