Banished : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील १११ जण हद्दपार

0
Banished : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील १११ जण हद्दपार
Banished : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील १११ जण हद्दपार

Banished : नगर : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने एकूण १११ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याची धडक कारवाई केली आहे.

हेही वाचा : अधिकाऱ्याच्या टेबलावरच फाशी घेण्याचा प्रयत्न; साखर पणन विभागाच्या कार्यालयातील प्रकार

पोलिसांचा फौजफाटा

शहरात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या आणि सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA), तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. बकरी ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र येणार असल्याने वाहतुकीचा ताण वाढण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन 28 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत एस.पी.ओ. चौक ते जी.पी.ओ. चौक दरम्यान सर्व प्रकारची चारचाकी व जड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहे.यंदाचा बकरी ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी शहरात २५०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

नक्की पहा : सोने खरेदीच्या बहाण्याने दागिने केले लंपास; पाथर्डीतील घटना सीसीटीव्हीत कैद

वाहनांची तपासणी (Banished)

बकरी ईद काळात कुर्बानीसाठी गोवंश वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गोवंश वाहतुकीवरून कोणताही वाद निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात तब्बल 22 ठिकाणी विशेष चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असून संशयित वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.