Kajwa Festival: काजवा महोत्सवाचा पर्यटकांनी आनंद घ्यावा: आमदार डॉ. लहामटे

अकोले तालुका "पर्यटनाची पंढरी" म्हणून विशेष ओळख

0


Kajwa Festival:अकोले: मे महिन्यात पहिल्या पावसाच्या सरी बरसू लागल्या की भंडारदरा परिसरात लाखो काजव्यांचा अद्भुत प्रकाशोत्सव (Kajwa Festival) सुरू होतो. झाडाझुडपांवर चमचमणाऱ्या काजव्यांमुळे संपूर्ण परिसर जणू तारकांनी उजळून निघाल्यासारखा भासतो. हा स्वर्गीय नजारा अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे दाखल होत असतात. यंदाच्या काजवा महोत्सवासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून पर्यटकांनी कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता निसर्गाच्या या अनोख्या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले आहे. अकोल्याच्या निसर्गसंपदेचा आणि काजव्यांच्या मोहक महोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.अ

अवश्य वाचा: सोने खरेदीच्या बहाण्याने दागिने केले लंपास; पाथर्डीतील घटना सीसीटीव्हीत कैद

अकोले तालुका “पर्यटनाची पंढरी” म्हणून विशेष ओळख (Kajwa Festival)

अकोले तालुका “पर्यटनाची पंढरी” म्हणून विशेष ओळख निर्माण करून आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा तालुका निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि साहसी पर्यटनाचा अनोखा संगम आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई, रोमांचक अनुभव देणारा हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, ऐतिहासिक रतनगड, ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण, हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले अमृतेश्वर मंदिर, तसेच महामुनी अगस्ती ऋषींचे आश्रमस्थळ ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. पावसाळ्यात दरी-खोऱ्यांत कोसळणारे मनमोहक धबधबे, निसर्गरम्य डोंगररांगा आणि उशिरा सूर्योदयासाठी प्रसिद्ध असलेले फोपसंडी गाव पर्यटकांना भुरळ घालतात. त्यामुळे वर्षभर राज्यासह देशाच्या विविध भागांतून पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते.