
Bhingar Camp Police : नगर : परराज्यातील विदेशी मद्याच्या (Foreign Liquor) बाटल्यांवरील मूळ लेबल काढून त्यावर महाराष्ट्रात उत्पादित मद्याचे बनावट लेबल (Counterfeit Label) लावून विक्री करण्याचा प्रयत्न भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) उघडकीस आणला. या कारवाईत विदेशी मद्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ९७ हजार ७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांची नावे समोर आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा : केंद्रीय पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; दुष्काळाच्या झळांची घेतली प्रत्यक्ष अनुभूती
पोलिसांच्या पथकाची घटनास्थळी धाव
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसबीआय चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाजवळ अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने प्रशांत बाबासाहेब पांढरे (वय २६, रा. पांढरे मळा, नागरदेवळे, ता. जि. अहिल्यानगर) असे नाव सांगितले. त्याच्याकडील विदेशी मद्याच्या बाटल्यांबाबत चौकशी केली असता, या बाटल्या प्रदीप फडतरे (रा. केकती, भिंगार, ता. जि. अहिल्यानगर) याच्याकडून मिळाल्याचे त्याने सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पुढील तपास सुरू (Bhingar Camp Police)
पोलिसांनी तपास केला असता, परराज्यातील विदेशी मद्याच्या बाटल्यांवरील मूळ लेबल काढून त्याऐवजी महाराष्ट्रात उत्पादित मद्याचे लेबल लावले जात असल्याचे समोर आले. संबंधित ठिकाणी झडती घेतल्यानंतर विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या आणि लेबल बदलण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ९७ हजार ७४५ रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये मॅजिक मोमेंट्स, रॉयल चॅलेंज, इम्पीरियल ब्ल्यू, ओल्ड मंक, रॉयल स्टॅग, फिनिशर आणि आयकॉनिक व्हाइट या ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबरमे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, योगेश पवार, सतीश भांड, मोहन भेटे, राम मोरे, प्रमोद लहारे, संदीप थोरात आणि कैलास शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.


