
३६ शाळांमधील स्पर्धकांवर मात करत मोठ्या गटात मिळविले यश; विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
Inter-school Singing Competition : अहिल्यानगर : कै. बाई इचरजबाई फिरोदिया यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित आंतरशालेय गायन स्पर्धेत (Inter-school Singing Competition) आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग (Jai Bajrang School) प्राथमिक विभागाची विद्यार्थिनी कु. अंतरा निनाद पारखी हिने मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गायनकलेचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली
या स्पर्धेत शहरातील ३६ शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध स्पर्धकांनी आपल्या गायनकलेचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत कु. अंतरा पारखी हिने आपल्या सुमधुर, सुरेल आणि भावपूर्ण गायनातून परीक्षकांवर विशेष छाप पाडली. सुरांवरील उत्तम पकड, ताल-लयबद्धता, स्पष्ट शब्दोच्चार, भावपूर्ण सादरीकरण आणि आत्मविश्वासपूर्ण गायनाच्या जोरावर तिने मोठ्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अंतराच्या यशामागे सहकार्य (Inter-school Singing Competition)
अंतराच्या या यशामागे तिचा सातत्यपूर्ण सराव, संगीताची आवड आणि योग्य मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. तिला विद्यालयाच्या वर्गशिक्षिका श्रीमती आशा घुले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिच्या गायनाला हार्मोनियमवर सौ. श्रद्धा निनाद पारखी, तबल्यावर श्री. सूरज शिंदे आणि तालसंगत श्री. निनाद विनायक पारखी यांनी साथ दिली.
कु. अंतरा निनाद पारखी हिने संपादन केलेल्या या यशाबद्दल आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी फिरोदिया, सहसचिव श्री. उमेशजी गांधी, व्यवस्थापक श्री. आशुतोष घाणेकर, सहव्यवस्थापक श्री. अमोल तोडकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित श्रीमती.सुरेखा दुधाडे मॅडम, श्रीमती आशा घुले मॅडम, राहुल मोरे आदी गुरुजन उपस्थित होते.


