Bulldozer Action : नगर : राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला आहे. प्रशासनाने संबंधित आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कारवाई केली.
हेही वाचा : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक : नवे राजकारण की जुनी परंपरा? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
प्रशासनाची संयुक्त कारवाई
घटना घडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर पोलीस, महसूल आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.
नक्की पहा : ‘तो’ मेल्यानंतर इथल्या मातीत देखील गाडू देऊ नका! संग्राम जगताप आक्रमक…
कारवाईचे स्वागत (Bulldozer Action)
या कारवाईमुळे राहाता शहरासह संपूर्ण तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल, ही भूमिका या कारवाईतून अधोरेखित झाली आहे. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पीडित कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.



