Case Registered : कापड बाजारात सार्वजनिक मालमत्ताचे नुकसान; कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पाया तोडण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचेही त्याने सांगितल्याचा उल्लेख

0
Case Registered : कापड बाजारात सार्वजनिक मालमत्ताचे नुकसान; कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Case Registered : कापड बाजारात सार्वजनिक मालमत्ताचे नुकसान; कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Case Registered : नगर : भिंगारवाला चौक ते कापड बाजार परिसरात पथदिव्याचा खांब उभारण्यासाठी तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा पाया विनापरवानगी (Without permission) तोडल्याप्रकरणी एका दुकानदाराविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशपाक सय्यद गुलाम रसूल (वय ४५, रा. गोविंदपुरा, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल (Case registered) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नक्की वाचा : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना

पथदिव्याचा पाया तोडण्यात आल्याची माहिती

याबाबत अहिल्यानगर महापालिकेचे प्रभारी विद्युत विभागप्रमुख अंतवन हाबाजी क्षेत्रे (वय ५५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा मार्गावर राज्य शासनाच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावर पथदिव्यांचे खांब उभारण्यासाठी रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रिटचे फाउंडेशन तयार करण्यात आले आहे. दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी क्षेत्रे यांना फोन करून कापड बाजार परिसरातील पथदिव्याचा पाया इलेक्ट्रिक ब्रेकरच्या साहाय्याने तोडण्यात आल्याची माहिती दिली.त्यानंतर क्षेत्रे यांनी महापालिकेचे सचिन परदेशी आणि अतिक्रमण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी पथदिव्याचा सिमेंट काँक्रिटचा पाया तोडलेला आढळून आला. तसेच तोडफोडीसाठी वापरण्यात आलेले साहित्यही घटनास्थळी दिसून आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सार्वजनिक मालमत्तेचे विनापरवाना नुकसान (Case Registered)

यावेळी संबंधित दुकानदाराकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव अशपाक सय्यद गुलाम रसूल असल्याचे सांगितले. पाया ये-जा करताना पायाला लागत असल्याने तो तोडल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच हा पाया तोडण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचेही त्याने सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे विनापरवाना नुकसान केल्याप्रकरणी क्षेत्रे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल नीता अडसरे करीत आहेत.