Case Registered : अकोले तालुक्यातील शेंडी येथे गुप्तधनाच्या आशेने अघोरी कृत्ये; गुन्हा दाखल

शेतात सात ते आठ जण अगरबत्ती, कापूर, लिंबू आणि उडीद ठेवून पूजा करत असल्याचे दिसले

0
Case Registered : अकोले तालुक्यातील शेंडी येथे गुप्तधनाच्या आशेने अघोरी कृत्ये; गुन्हा दाखल
Case Registered : अकोले तालुक्यातील शेंडी येथे गुप्तधनाच्या आशेने अघोरी कृत्ये; गुन्हा दाखल

Case Registered : अकोले : तालुक्यातील शेंडी येथे गुप्तधन (Hidden treasure) मिळविण्याच्या आशेने शेतात अंधश्रद्धा (Superstition) आणि जादूटोण्याशी संबंधित कृत्ये करत असल्याच्या संशयावरून सात जणांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी (ता.२६) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : दुष्काळग्रस्तांच्या ताटात निकृष्ट धान्य; स्मितल वाबळे व टिळक भोस यांचा आक्रमक पवित्रा

गुप्तधन काढण्याच्या नावाखाली हे कृत्य

याबाबत शेंडी येथील शेतकरी एकनाथ दगडू भांगरे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. ते २७ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या शेतातील भात पिकाला पाणी भरत असताना त्यांना शेतात उजेड दिसला. संशय आल्याने त्यांनी शेजारील सुदाम मारुती ईदे आणि सुरेश भाऊराव भांगरे यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. तिघांनी जवळ जाऊन पाहिले असता, शेतात सात ते आठ जण अगरबत्ती, कापूर, लिंबू आणि उडीद ठेवून पूजा करत असल्याचे दिसले. गुप्तधन काढण्याच्या नावाखाली हे कृत्य सुरू असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मंत्रोच्चार करून खड्डा खोदायचा आणि गुप्तधन मिळाल्यानंतर ते आपसात वाटून घ्यायचे, अशी चर्चा संशयितांमध्ये सुरू असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पळून जाण्याचा प्रयत्न (Case Registered)

हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा पाठलाग करून योगेश गणेश वानखेडे (रा. दोनवाडा, ता. व जि. अकोला), त्रिंबक रावजी वानखेडे (रा. भोरगाव, ता. व जि. अकोला), अनंता कृष्णराव हिंगोले (रा. मोठी उंब्री, ता. व जि. अकोला), गणेश रामहरी घोरपडे (रा. मोठी उंब्री, ता. व जि. अकोला), रूपेश गणेश वानखेडे (रा. अकोला), ज्ञानेश्वर नामदेव लेंडे (रा. पाभुळवंडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) व संजय लक्ष्मण खाडे (रा. बारी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) या सात जणांना पकडण्यात आले. घटनास्थळी एक कार (क्र. एमएच.३१, डीव्ही. ९६२८) आणि एक मोटारसायकल (क्र. एमएच.१७, बीपी.९५१०) आढळून आली.

ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयितांना शेंडी गावठाणातील मारुती मंदिरात आणले. त्यानंतर आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधून त्यांना राजूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून कापूर, अगरबत्ती, लिंबू आणि उडीद यांसारखे पूजासाहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकोले पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.