
Inferior-Quality Grain : श्रीगोंदा : आभाळाने पाठ फिरवल्यामुळे आधीच दुष्काळाच्या (Drought) भीषण झळांनी होरपळलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी (Farmers) व सर्वसामान्यांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच मढेवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित केल्या जाणाऱ्या धान्याच्या दर्जाबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, गोरगरिबांच्या ताटात खाण्यायोग्य नसलेले निकृष्ट धान्य (Inferior-Quality Grain) दिले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या संवेदनशील विषयाला अहिल्यानगर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्मितल वाबळे यांनी जोरदार वाचा फोडली असून, टिळक भोस यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नक्की वाचा : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सध्या दुष्काळामुळे शेतात पीक नाही आणि हाताला काम नाही. अशा हलाकीच्या परिस्थितीत शासनाचे स्वस्त धान्यच कुटुंबाचा एकमेव आधार असतो. मात्र, याच धान्याचा दर्जा निकृष्ट निघाल्याने “दुष्काळात तेरावा महिना” अशी अवस्था झाली आहे. हा प्रश्न केवळ वितरणाचा नसून मूळ खरेदी प्रक्रियेचा आहे. शासनाने मोठ्या खर्चाने खरेदी केलेले धान्य सुरुवातीलाच निकृष्ट होते का, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रयोगशाळेत तपासणी करावी (Inferior-Quality Grain)
संबंधित धान्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि गुणवत्तेच्या तपासणीत कसूर करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून नागरिकांना तात्काळ दर्जेदार धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. दुष्काळाने हतबल झालेल्या जनतेच्या ताटातील घास सुरक्षित व दर्जेदार असावा, अशी आर्त हाक यानिमित्ताने दिली जात आहे.


