Cast Validity : जात वैधता प्रमाणपत्रांतील त्रुटी पूर्ततेसाठी २४ व २५ जून रोजी विशेष शिबिर

0
Cast Validity : जात वैधता प्रमाणपत्रांतील त्रुटी पूर्ततेसाठी २४ व २५ जून रोजी विशेष शिबिर
Cast Validity : जात वैधता प्रमाणपत्रांतील त्रुटी पूर्ततेसाठी २४ व २५ जून रोजी विशेष शिबिर

Cast Validity : नगर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्रांतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने २४ व २५ जून २०२६ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे त्रुटी कळविण्यात आल्यानंतरही अद्याप त्रुटींची पूर्तता न केलेल्या अर्जदारांनी या संधीचा लाभ घेत आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, उपायुक्त राकेश पाटील व सदस्य सचिव अनिल तिदमे यांनी केले आहे.

हेही वाचा :  तांबेवाडी येथे भिंत फोडून घरफोडी; एक लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास

काय आहे प्रक्रिया?

बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि सीईटीच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे प्रस्ताव हार्ड कॉपी स्वरूपात तात्काळ समितीच्या कार्यालयात सादर करावेत. यामुळे प्रवेशावेळी होणारी धावपळ टाळता येईल. तसेच सेवाविषयक प्रकरणांमध्ये ज्या अर्जदारांना ऑनलाइन त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत, त्यांनीही तात्काळ कार्यालयात येऊन प्रस्तावाची हार्ड कॉपी सादर करणे आवश्यक आहे.

नक्की पहा : अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीसाठी आमदार राजळे यांची धाव; स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात केले दाखल

अधिकृत कागदपत्रे (Cast Validity)

जात पडताळणी प्रक्रियेसाठी अर्जदारांनी खाजगी सेतू चालक किंवा इतर त्रयस्थ व्यक्तींवर अवलंबून राहू नये. अर्ज भरताना स्वतःचा अथवा पालकांचा अचूक ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक नमूद करावा. शपथपत्रातील वंशावळ ही संबंधित अधिकृत कागदपत्रांच्या आधारेच तयार करावी. तसेच ऑनलाइन अर्ज करताना वापरलेले युजरनेम व पासवर्ड स्वतःकडे जतन करून ठेवावेत. समितीने गतवर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या एकूण ३८ हजार २०२ प्रकरणांपैकी ३६ हजार ०४८ प्रकरणे निकाली काढली आहेत. सध्या २ हजार १५४ प्रकरणे प्रक्रियेत आहेत.