
Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा : नगरपालिकेच्या (Shrigonda Municipal Council) सर्वसाधारण सभेमध्ये आज (ता. २३) सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेने (Shiv Sena) अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. शहरातील जनतेच्या आणि व्यापाऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जाणीवपूर्वक नाकारण्यात आल्याचा आरोप करत, शिवसेनेच्या सर्व नऊ नगरसेवकांनी सभेवर जाहीर बहिष्कार टाकत जोरदार आंदोलन (Agitation) केले. नगरसेवकांच्या घोषणांनी नगरपरिषद परिसरात गोंधळ उडाला होता.
नक्की वाचा : तांबेवाडी येथे भिंत फोडून घरफोडी; एक लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास
सभेच्या नियमबाह्य विषयपत्रिके विरोधात मागितली दाद
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी श्रीगोंदा शहरातील जनतेच्या हिताचे विविध महत्त्वाचे प्रश्न विषयपत्रिकेवर घेण्याची कायदेशीर विनंती केली होती. नगरसेवक अख्तर सिकंदर शेख यांनी आधीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या सभेच्या नियमबाह्य विषयपत्रिके विरोधात दाद मागितली होती आणि ‘सभासदांचे प्रश्न’ हा अनिवार्य विषय वगळल्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. मात्र, आज प्रत्यक्ष सभेमध्ये सत्ताधारी पक्षाने लोकहिताचा कोणताही विचार न करता, नेहमीप्रमाणेच मनमानी पद्धतीने हे विषय सभेत घेण्यास साफ नकार दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सभेच्या ठिकाणीच जोरदार आंदोलन (Shrigonda Municipal Council)
सध्या श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. या अर्धवट आणि संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाला प्रचंड मनस्ताप व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन, संबंधित ठेकेदाराला थेट सभेमध्ये बोलावून जाब विचारावा, अशी आग्रही विनंती शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु, जनहिताशी काहीही देणेघेणे नसलेल्या सत्ताधारी आणि प्रशासनाने या अत्यंत न्याय्य मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या या दडपशाही आणि मनमानी कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी सर्व नऊ नगरसेवकांनी सभेच्या ठिकाणीच जोरदार आंदोलन सुरू करत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला.


