Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मांडले मतदारसंघातील विविध प्रश्न

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मांडले मतदारसंघातील विविध प्रश्न

0

Chief Minister Devendra Fadnavis : अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघातील (Akole Assembly Constituency) विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांबाबत आमदार डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamte) यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी कायदा व सुव्यवस्था, आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांशी संबंधित महत्त्वाचे विषय मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

नक्की वाचा : सेफ्टी दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; कपाट फोडून रोकड लंपास

सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी

मतदारसंघात वाढत असलेल्या अवैध दारू व्यवसायावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करता यावी यासाठी संबंधित कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करून पात्र नागरिकांना अधिक सुलभ व प्रभावी आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राजूर उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी देण्याची मागणी (Chief Minister Devendra Fadnavis)

राजूर परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा विचार करून राजूर उपजिल्हा रुग्णालयास विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार लहामटे यांनी केली. तसेच तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अकोले पोलीस ठाण्याची नवीन इमारत व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहत मंजूर करण्याचा मुद्दाही त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडला.

दरम्यान, कोल्हार-घोटी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत तसेच मतदारसंघातील विविध विकासकामे आणि जनहिताच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मांडलेल्या सर्व विषयांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार लहामटे यांनी दिली. त्यामुळे मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.