
Crime Filed : नगर : एमआयडीसी परिसरातील जी-१७ येथील इपीटॉम कंपोनंट्स कंपनीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील ६० हजार रूपयांची रोकड आणि ३० हजार रूपये किमतीची चांदीची पाच नाणी, असा एकूण ९० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी (ता.१९ ) रात्री आठ ते शुक्रवारी (ता.२०) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कंपनीचे एचआर वेदांत विलास छिंदम (वय ३२, रा. तोफखाना, अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) मंगळवारी (ता.२४ ) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
९० हजार रूपयांचा ऐवज चोरी (Crime Filed)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील जी-१७ येथील इपीटॉम कंपोनंट्स कंपनीच्या सीओंच्या कार्यालयासह कंपनी मालकाच्या कार्यालयाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर कार्यालयात प्रवेश करून आतील ६० हजार रूपयांची रोकड आणि प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाची चांदीची पाच नाणी चोरून नेली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी या गुन्ह्याची नोंद केली आहे.
दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी पथकासह भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे तपास करीत आहेत.


