Crime News : राहात्यातील बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; श्रीरामपुरातील डॉक्टरसह दोघे गजाआड

0
Crime News : राहात्यातील बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; श्रीरामपुरातील डॉक्टरसह दोघे गजाआड
Crime News : राहात्यातील बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; श्रीरामपुरातील डॉक्टरसह दोघे गजाआड

नगर: राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या (Illegal Fetal Sex Determination) गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घातलाय. श्रीरामपूर (Shirampur) शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर रवींद्र कुटेसह दोन एजंट यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी (Three-day police custody) त्यांना देण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर आणि लोणी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

नक्की वाचा: शिर्डीत २०० रुपयांचा गजरा विकला २ हजाराला, श्रद्धेच्या नावाखाली भाविकांची लूट ; नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं? (Crime News)

श्रीरामपूर शहरातील डॉ. रवींद्र कुटेंसह प्रदीप भाऊसाहेब ढगे, निलेश ज्ञानेश्वर भवर असे या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. २९ एप्रिल २०२६ ला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कालव्यात लगत असलेल्या एका खोलीत गर्भवती महिलांकडून तब्बल १० हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे समोर आले होते. या माहितीची खातरजमा करत पोलीस पथकाने वैद्यकीय अधिकार्‍यांसह आणि पीसीपीएनडीटी प्राधिकरणाच्या उपस्थितीत सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात डॉ. राहुल भणगे आणि अभिजीत भुसाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. या घटनास्थळावरून अल्ट्रासोनोग्राफी मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम, विविध साहित्य आणि तीन चारचाकी वाहने असा तब्बल २४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

अवश्य वाचा: रक्ताचं नातं बनलं वैरी! पुण्यात आजोबाकडून ९ वर्षांच्या नातीवर अत्याचार

या तपासाच्या पुढील टप्प्यात तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करणारे प्रदीप ढगे आणि निलेश भवर यांचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी दोघांनाही शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे, आरोपींच्या चौकशीतून श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे यांचाही या गैरप्रकारात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील काही घटकांकडून होत असलेल्या गंभीर गैर प्रकारांचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. गर्भलिंग निदानासारख्या कायद्याने बंदी असलेल्या आणि समाजात लिंगभेद वाढवणार्‍या कृत्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

रॅकेटमध्ये डॉक्टर आणि एजंट यांचा सहभाग (Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर आणि एजंट यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. लोणी पोलीस स्टेशनमार्फत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लोणी पोलीस स्टेशनच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. समाजातील कन्या भ्रूणहत्येस कारणीभूत ठरणार्‍या अशा रॅकेट्स विरोधात ही कारवाई एक कठोर इशारा मानली जात आहे.