Cyber ​​Police : सायबर पोलिसांची दमदार कामगिरी; फसवणुकीचे १३.५६ लाख रुपये फिर्यादीला परत

Cyber ​​Police : सायबर पोलिसांची दमदार कामगिरी; फसवणुकीचे १३.५६ लाख रुपये फिर्यादीला परत

0
Cyber ​​Police : सायबर पोलिसांची दमदार कामगिरी; फसवणुकीचे १३.५६ लाख रुपये फिर्यादीला परत
Cyber ​​Police : सायबर पोलिसांची दमदार कामगिरी; फसवणुकीचे १३.५६ लाख रुपये फिर्यादीला परत

Cyber ​​Police : नगर : सायबर गुन्हेगारांनी कंपनीचा ई-मेल हॅक करून बनावट लेटरहेड आणि बदललेल्या बँक खात्याच्या आधारे केलेल्या आर्थिक फसवणुकीचा अहिल्यानगर सायबर पोलिसांनी (Cyber ​​Police) यशस्वी तपास केला आहे. या प्रकरणात फसवणूक (Fraud) झालेली तब्बल १३ लाख ५६ हजार ९५७ रुपयांची संपूर्ण रक्कम फिर्यादीला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.

ई-मेल आयडी हॅक करून बँक खात्याचे तपशील बदलले

या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कंपनी एका मोठ्या ग्राहक कंपनीला साहित्य व सेवा पुरवते. या व्यवहाराचे पेमेंट ग्राहक कंपनीकडून येणे बाकी होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी फिर्यादींच्या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक केला. कंपनीच्या मूळ लेटरहेडसारखे हुबेहूब बनावट लेटरहेड तयार करून त्यावर बँक खात्याचे तपशील बदलण्यात आले. त्यानंतर बदललेल्या खात्याची माहिती आणि बनावट चेक ग्राहक कंपनीला ई-मेलद्वारे पाठवून त्याच खात्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. ई-मेलवर आलेल्या सूचनेनुसार ग्राहक कंपनीने दोन टप्प्यांत एकूण १३ लाख ५६ हजार ९५७ रुपये संबंधित खात्यावर जमा केले. मात्र, ही रक्कम फिर्यादींच्या मूळ खात्यात जमा न होता सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या खात्यात गेली. त्यामुळे कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक झाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांच्या तत्परतेमुळे रक्कम परत मिळविण्यात यश (Cyber ​​Police)

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगर सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संबंधित बँकांशी संपर्क साधून व्यवहारांची माहिती मिळविण्यासह आवश्यक तो पाठपुरावा करण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे परत मिळविण्यात यश आले.


दरम्यान, कंपन्यांचे ई-मेल हॅक करून बँक खात्यांमध्ये बदल केल्याचे बनावट संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, व्यापारी आणि नागरिकांनी ई-मेलद्वारे बँक खाते बदलण्याची सूचना प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर फसवणूक झाल्यास वेळ न घालवता १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब हिंगे आणि अन्य पोलीस अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.