
Shantikumarji Firodia Memorial Foundation : अहिल्यानगर : आपल्यासोबतच समाजातील दुर्बल व दिव्यांग बांधवांच्या जीवनातही दीपोत्सवाचा खरा आनंद फुलावा, या अत्यंत संवेदनशील उद्देशाने अहिल्यानगरमध्ये माणुसकीचा अनोखा सोहळा संपन्न झाला. ‘शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन’ (Shantikumarji Firodia Memorial Foundation) यांच्या संपूर्ण सहयोगातून आणि ‘दिव्यदृष्टी दिव्यांग संस्था, अहिल्यानगर’ यांच्या वतीने काल (दि. ६) ‘हॉटेल फरहद’ येथे १५० गरजू दिव्यांग कुटुंबांना अत्यंत उत्साहात किराणा किट व दिवाळी (Diwali) मिठाईचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग कुटुंबांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंददायी
यापूर्वी भाजीपाला व फळफळावळ अडते असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुमारे १५० दिव्यांग बांधवांना किराणा व मिठाई वाटप करण्यात आले होते. त्यानंतर काल पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मुख्य सोहळ्यात ‘शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन’ने अतिशय भरीव स्वरूपात सहकार्य करत दिव्यांग कुटुंबांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंददायी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ‘शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन’ व ‘आय लव नगर’चे संस्थापक नरेंद्रजी फिरोदिया यांनी भूषविले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अध्यक्षपदावरून बोलताना नरेंद्रजी फिरोदिया म्हणाले, (Shantikumarji Firodia Memorial Foundation)
“दिव्यांगांच्या आणि गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ‘दिव्यदृष्टी दिव्यांग संस्था’ जी जिद्दीने आणि अहोरात्र सेवाकार्य करत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा संवेदनशील उपक्रमांमुळे समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो आणि आमच्या फाऊंडेशनतर्फे अशा प्रत्येक चांगल्या कार्याला सदैव भक्कम सहकार्य व पाठबळ दिले जाईल.”

याप्रसंगी व्यासपीठावर राजेंद्र रोकडे, अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ, डॉ. गजानन काशीद, कृष्णा तवले, अशोकराव लाटे आणि प्रा. डॉ. विजय कदम हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सणाचा आनंद पोहोचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. नागरिकांनीही या उपक्रमातून प्रेरणा घेऊन किमान एका गरीब कुटुंबाची दिवाळी आनंदमयी करावी,” असे आवाहन भाजीपाला व फळफळावळ अडते असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोल चव्हाण यांनी अतिशय प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी कृष्णा तवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिव्यदृष्टी दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी सुनील बाचकर, किरण खेतमाळस, सुभाष शिंदे, वरद गंधारे आणि अश्विनी जपे यांनी विशेष परिश्रम घेतले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकीतून मिळणारे हे प्रेरणादायी व विस्तीर्ण सहकार्य समाजमनात कायम आदराचे स्थान मिळवून देणारे ठरत आहे.


