Theft of a gold chain : माळीवाडा बसस्थानकात दोन टोळ्यांची चैन लांबविली; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Theft of a gold chain : माळीवाडा बसस्थानकात दोन टोळ्यांची चैन लांबविली; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Theft of a gold chain : नगर : पाथर्डीला जाणाऱ्या बसमध्ये मैत्रिणीला बसविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरून (Theft of a gold chain) नेली. माळीवाडा बसस्थानकात गुरूवारी (ता.५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भाविका मयुर टिड वाणी (वय ३२, रा. मनोलिला नगर, बोल्हेगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे.

दरवाजाजवळ जाऊन बॅग देताना चैन गायब

गुरूवारी दुपारी त्या बोल्हेगाव येथून मैत्रीण प्रगती दहिफळे यांना पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे सोडण्यासाठी स्वतःच्या दुचाकीवरून माळीवाडा बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी सव्वादोनच्या सुमारास अहिल्यानगर-पाथर्डी ही बस बसस्थानकात आली. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने प्रगती दहिफळे यांनी त्यांची बॅग भाविका यांच्याकडे दिली आणि त्या बसमध्ये चढल्या. भाविका यांनी दरवाजाजवळ जाऊन बॅग त्यांना दिली. त्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी त्यांच्या चैन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले..

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संधी साधून गळ्यातील सोन्याची चैनची चोरी (Theft of a gold chain)

बसच्या दरवाजाजवळ गर्दी असताना चोरट्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार पंडित करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here