DIC : २४ जून रोजी जामखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
DIC : २४ जून रोजी जामखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
DIC : २४ जून रोजी जामखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

DIC : नगर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, अहिल्यानगर आणि जामखेड महाविद्यालय, जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जामखेड महाविद्यालय, नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे, जामखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त योगेश ना. उगले यांनी केले आहे.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात २६ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’

अशी होणार निवड

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील १० ते १५ नामांकित उद्योजक सहभागी होणार असून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी एसएससी, एचएससी, सर्व शाखांतील पदवीधर (बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., अभियांत्रिकीसह सर्व ट्रेड), डिप्लोमा तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.

नक्की पहा : आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा डंका थेट देशाची राजधानी दिल्लीत वाजला आहे!

अशी करा नोंदणी (DIC)

इच्छुक उमेदवारांनी रोजगार विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in⁠ या सेबसाईटवर तसेच https://forms.gle/BFrfWVAFXb53gZCN6 या लिंकवर नोंदणी करुन उद्योजकांकडे अप्लाय करावे. उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, बायोडाटा आणि आवश्यक प्रमाणपत्रांसह रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांच्या ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.