Amol Khatal : संगमनेर : त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर (Trimbakeshwar to Pandharpur) जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज (Saint Nivruttinath Maharaj) पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
नक्की वाचा : रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला फुटबॉल फिव्हरचा आनंद
पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध
तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारेगाव ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी पालखी मार्गावरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण यांसह इतर आवश्यक उपाययोजनांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.आमदार खताळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कटिबद्ध राहाण्याच्या सूचना (Amol Khatal)
या निधीचा योग्य वापर करून पालखी मार्गावरील सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. वारकऱ्यांना मुक्काम, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित प्रवास यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कटिबद्ध राहावे, अशा सूचना देखील आमदार अमोल खताळ यांनी दिल्या. यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी दिली. पारेगावच्या वतीने महायुतीचे, रावसाहेब गडाख यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश दळवी यांनी प्रस्ताविक आणि स्वागत केले. तर कैलास गोर्डे यांनी आभार मानले
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी कामेश टावरे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे जेष्ठ नेते भीमराज चत्तर, एकनाथ मुंगसे, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, संपत फड, हरीश चकोर, श्रीकांत गोमासे, किसन चत्तर, डॉ. संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, सुरेश दळवी, रावसाहेब गडाख, किशोर गडाख, बाबासाहेब गोर्डे, पुंजाहरी गडाख, सुनील वाकचौरे, भीमराज गडाख, मधुकर गडाख, सूर्यभान गडाख, सुभाष गडाख, आकाश गडाख, अनिकेत गाडेकर, राजेंद्र गुंजाळ, निलेश गडाख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



