
Theft of Drip Irrigation Pipes : कर्जत : निमगाव डाकू (ता.कर्जत) शिवारातून तब्बल तीन लाख रुपयांचे ठिबक पाईप वाहनांतून चोरून (Theft of Drip Irrigation Pipes) नेण्यात आले होते. या घटनेत कर्जत पोलिसांनी (Karjat Police) तीन आरोपींना अटक (Accused Arrested) करीत १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नक्की वाचा : वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या : खताळ
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन सखोल तपास
मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव डाकू (ता.कर्जत) शिवारात अज्ञात इसमांनी टेम्पोमधून सुमारे तीन लाख रुपयांचे ठिबक पाईप चोरून नेले होते. याबाबत प्रकाश किसन वाघुले (आळकुटी ता.पारनेर) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्यात तांत्रिक बाबींची पडताळणी व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन सखोल तपास केला असता हा गुन्हा ऋतुराज रणजित सोनवणे (सणसर भवानीनगर ता. इंदापूर) अमोल तान्हाजी सांळुखे (अकलुज ता. माळशिरस), आकाश अशोक हदिमनी (कन्हेरगाव ता. माढा), जनार्दन विलास लोखंडे (अकलुज ता. माळशिरस), अक्षय किसन सोनवणे ( सणसर ता. इंदापुर) आणि विजु शिंदे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोपींबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू (Theft of Drip Irrigation Pipes)
या सहा पैकी ऋतुराज सोनवणे, अमोल सांळुखे आणि आकाश हदिमनी या तिघांना कर्जत पोलीसांनी जेरबंद केले. त्यांच्याकड़े १ लाख ४६ हजाराचे ठिबक पाईप, एक मारुती कंपनीची चारचाकी आणि विटकरी रंगाचा टाटा आयशर टेम्पो हस्तगत करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पसार असलेल्या तिन्ही आरोपींबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे करीत आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक रमीझ मुलाणी, सपोनि संदिप वसावे, बाळासाहेब मुळीक यांच्यासह पोलीस कर्मचारी मिनाक्षी कांबळे, प्रताप देवकाते, विशाल क्षिरसागर, प्रकाश दंदाडे, अमोल रायकर, किरण बोऱ्हाडे, किरण जाधव, सचिन थोरात, नानासाहेब वाघमारे, वैभव गांगर्डे, मोबाईल सेल विभागाचे राहुल गुंडु आणि अरुण सांगळे यांनी पार पाडली.


