
District Police Force : नगर : जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या (Police Station) प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये नुकतेच बदल करण्यात आल्यानंतर आता जिल्हा पोलीस दलातील (District Police Force) सेकंड अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) यांनी सोमवारी (ता.२२) आदेश काढत तीन पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ३४ पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण ५८ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत.
नक्की वाचा : माहितीचा अधिकार कायदा वाचवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये नागरिकांचा एल्गार
प्रशासन गतिमान करण्याच्या उद्देशाने बदली प्रक्रिया
दरम्यान, नव्याने जिल्ह्यात आलेल्या अधिकाऱ्यांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेमणुका देण्यात आल्या असून काही अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच पोलीस प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव,(District Police Force)
कंसात बदली ठिकाण पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ (द.वि.प. अहिल्यानगर), विजय देशमुख (जिल्हा विशेष शाखा), संतोष भंडारे (नियंत्रण कक्ष), सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर (राहुरी), सोमनाथ दिवटे (पारनेर), संदीप वसावे (नेवासा), पुनम श्रीवास्तव (कोतवाली), वर्षाबाई जाधव (जामखेड, मुदतवाढ), मंगेश गोटला (पाथर्डी), गणेश अहिरे (श्रीगोंदा, मुदतवाढ), रमीझ मुलाणी (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय), अशोक काटे (कर्जत), गणेश जाधव (कर्जत), प्रदीप एकशिंगे (तोफखाना), शंकर मुटेकर (शेवगाव), विशाल चिटणीस (कोतवाली), रोहन खंडागळे (पाथर्डी), चेतन लोखंडे (श्रीरामपूर शहर), विकास ढोकरे (संगमनेर शहर), दीपक धनवटे (शनिशिंगणापूर), अजिनाथ कोठाळे (आर्थिक गुन्हे शाखा), नरहरी फड (आर्थिक गुन्हे शाखा), अजित मोरे (जामखेड), कल्पेशकुमार चव्हाण (शिर्डी), पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब परदेशी (अहिल्यानगर शहर वाहतुक शाखा, मुदतवाढ), प्रवीण पाटील (तोफखाना), सुरज मेढे (संगमनेर शहर), मनोहर खिळदकर (एमआयडीसी), मनोज आहिरे (राहुरी), विलास जाधव (शेवगाव), समाधान फडोळ (आश्वी), मनोज मोंढे (नगर तालुका), शितल मुगडे (श्रीरामपूर शहर), प्रदीप बोऱ्हाडे (शिर्डी), फराहनाज पटेल (संगमनेर तालुका), शलमोन सातपुते (अकोले), आशिष चौधरी (लोणी, मुदतवाढ), रंजीत मारग (पारनेर, मुदतवाढ), सचिन लिमकर (श्रीगोंदा, मुदतवाढ), कमलाकर चौधरी (कोपरगाव तालुका, मुदतवाढ), विकास जाधव (स्थानिक गुन्हे शाखा), कृष्णकुमार सेंदवाड (स्थानिक गुन्हे शाखा), मंगेश नागरगोजे (नगर तालुका), प्रवीण महाले (घारगाव), रोशन निकम (श्रीरामपूर शहर, मुदतवाढ), विनोद खांडबहाले (शेवगाव), प्रियंका आठरे (भरोसा सेल, मुदतवाढ), गजेंद्र इंगळे (कर्जत), संदीप मुरकुटे (पाथर्डी), दीपक मेढे (कोतवाली), महादेव गुट्टे (शिर्डी), अमोल गर्जे (एमआयडीसी), समाधान सोळुंके (कोतवाली), सुहास आव्हाड (भिंगार), संदीप दरवडे (स्थानिक गुन्हे शाखा), किशोर जाधव (सोनई), गणेश आघाव (जामखेड), किरण कोठुळे (सुपा) अशी बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.


