Election : नगर : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक उद्या (ता. २६) सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत होणार असून जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले.
हेही वाचा : गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे जलदिडींचे उत्साहात आयोजन
६० उमेदवार निवडणूक रिंगणात (Election)
या निवडणुकीसाठी राज्यभरातून एकूण ६० उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी ९ सदस्य निवडले जाणार आहेत. मतदार म्हणून परिषदेकडे नोंदणीकृत आधुनिक वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पाच मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, एकूण मतदार संख्या २९१६ इतकी आहे. मतदारांची ओळख पटविण्यासाठी परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र, छायाचित्र नसल्यास अन्य फोटो ओळखपत्र, परिषदेकडून दिलेले ओळखपत्र व भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली छायाचित्र असलेली सर्व ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. ओळखीचा पुराव्यांची मुळ प्रत आवश्यक आहे. छायांकित व मोबाइलमधील प्रत ग्राद्धा धरली जाणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाइल नेता येणार नाही.
नक्की पहा : सुजय विखे पाटील यांचा रोहित पवारांवर निशाणा
जिल्ह्यासाठी पाच मतदान केंद्र निश्चित (Election)
अहिल्यानगर शहरातील डॉ. ना. ज. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ४ मतदान केंद्र व डॉ. ना. ज. पाटील फार्मसी कॉलेज, वसंत टेकडी, सावेडी येथे १ असे एकूण ५ केंद्रांवर मतदान होणार आहे.



