Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची मध्यरात्री भेट घेण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले की… 

0
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची मध्यरात्री भेट घेण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले की... 
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची मध्यरात्री भेट घेण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले की... 

नगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची मध्यरात्री दोन वाजता भेट झाल्याचा दावा (Claim to have met) करण्यात आला होता. या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या वृत्तावर आता फडणवीस यांनी थेट उत्तर दिले आहे.

नक्की वाचा: आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते. देव दर्शनानंतर त्यांनी गोदा ते नर्मदा जल यात्रेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “असं आहे की, उद्धव ठाकरे यांना जर माझ्याशी बोलायचे असेल अथवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती उघडपणे होऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत, की जे लपवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोकं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सला नोटीस बजावण्यात येईल.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री भेट झाल्याचे वृत्त खोटं असल्याचे स्वतः मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीवर आता पडदा पडला आहे.

अवश्य वाचा: उन्हाळ्यात घराबाहेर पडताना महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

एका मीडिया हाऊसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री २ वाजता भेट झाल्याचे वृत्त दिले होते. त्यातून राज्यात एकच खळबळ उडाली होती. ही भेट विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर झाली नसावी ना, असे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आता सगळ्याच चर्चांना ब्रेक लागला आहे.