3 हजार 700 रुपयांचा आकारला दंड
AMC : नगर : शहर स्वच्छ (Clean City), सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिकेने (AMC) स्वच्छता नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम (Against Rule Violators) अधिक तीव्र केली आहे.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
आयुक्तांच्या निर्देशानुसार मोहीम
बुधवार (दि.२२) रोजी शहरातील शहाजी रोड, नवी पेठ, घास गल्ली, तांबटकर गल्ली आणि गांधी मैदान परिसरात स्वच्छता मोहिमे अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण सहा जणांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उघड्यावर कचरा जळणाऱ्याकडून दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य स्वच्छता निरीक्षक पी. व्ही. रामदिन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, प्रसाद बाळू उमाप, प्रशांत चांदणे तसेच मुकादम किशोर वैरागर, अमर वैराळ आणि ओंकार साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आयुक्त डांगे यांनी नागरिकांना शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे व उघड्यावर लघुशंका करणे, उघड्यावर कचरा जाळणे टाळावे, अन्यथा अशा दंडात्मक कारवाया यापुढे अधिक तीव्र करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उघड्यावर कचरा जळणाऱ्याला ठोठावला दंड (AMC)
अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील गुरु कार सजावट या दुकानदाराने उघड्यावरच दुकानातील कचरा जाळल्याने महापालिकेच्या पथकाने त्याला गुरुवारी (23) दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. कुणी उघड्यावर कचरा जाळताना आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.
स्वच्छतेत नागरिकांची साथ महत्त्वाची ;आयुक्त
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे. कचरा घंटा गाडीतच कचरा टाकावा. स्वच्छता नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.



