
Environmentally Sensitive Area : नगर : केंद्र शासनाने (Central Govt) २७ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Environmentally Sensitive Area) मसुदा अधिसूचनेनुसार, महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील एकूण २,१३३ गावे समाविष्ट आहेत, त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ गावे या प्रस्तावित संवेदनशील क्षेत्रात येतात. यामध्ये प्रामुख्याने अकोले तालुक्याच्या (Akole Taluka) सह्याद्री डोंगररांगांच्या परिसरात ही गावे येतात. या मसुद्यावर आपल्या हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी नागरिक व ग्रामस्थांना ६० दिवसांची मुदत दिली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा अमली पदार्थ मुक्त करणार : मुम्मका सुदर्शन
हवामान बदलामुळे या नाजूक परिसंस्थेला गंभीर धोके निर्माण
जैवविविधतेचे रक्षण करतानाच स्थानिक विकास व पर्यावरणाचा समतोल साधणे हा या अधिसूचनेचा मुख्य उद्देश आहे. अकोले तालुक्याच्या सह्याद्री डोंगररांगांचा पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश केला आहे. हिमालयापेक्षाही प्राचीन असलेल्या या सह्याद्री डोंगररांगेत प्रमुख नद्यांचा उगम होतो. म्हणूनच या प्रदेशाला ‘दक्षिण भारताचा जलसाठा’ मानले जाते. भारताच्या हवामान नियमनात या प्रदेशाची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. परंतु, अनियंत्रित मानवी हस्तक्षेप, अधिवासांचे तुकडीकरण, परदेशी वनस्पतींचे अतिक्रमण आणि हवामान बदलामुळे या नाजूक परिसंस्थेला गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उपक्रमांचे तीन स्पष्ट वर्गांत वर्गीकरण (Environmentally Sensitive Area)
या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ (ESA) अधिसूचनेअंतर्गत मानवी उपक्रमांचे तीन स्पष्ट वर्गांत वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यातील पूर्णपणे प्रतिबंधित उपक्रमानुसार या प्रस्तावित क्षेत्रामध्ये नवीन मोठ्या प्रमाणावरील खाणकाम, दगड-रेती उत्खनन, रेड कॅटेगरीतील प्रदूषणकारी उद्योग आणि मोठ्या बांधकामांवर कडक बंदी असनार आहे. यामध्ये स्थानिक शेती, बागायती, फळबागा, दैनंदिन पारंपरिक उपजीविका आणि जनावरांचे चरण्याचे क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित राहील. तसेच स्थानिकांचे कोणतेही विस्थापन होणार नसून घरांच्या दुरुस्तीवर कोणतीही बंदी असणार नाही


