
Fadanvis : नगर : खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळेनासे झाल्याने ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. “राज्यात अचानक पेट्रोल-डिझेलच्या मागणीत २० ते ३० टक्क्यांनी झालेली वाढ संशयास्पद असून, यात काहीतरी मोठी गडबड असण्याची शक्यता आहे,” अशी शंका व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी अवैध साठेबाजांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न
साठेबाजांवर कठोर कारवाई
शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामीण भागातील इंधन टंचाई आणि वाढत्या गर्दीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “बळीराजाला ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल कमी पडू नये, ही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत अचानक मागणीत झालेली वाढ सामान्य नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी इंधनाची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार करत असेल, तर त्यांची अजिबात गय केली जाणार नाही.”
नक्की पहा : संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टरची पाहणी
‘आरसी’ तपासूनच डिझेल (Fadanvis)
ग्रामीण भागातील गोंधळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने काही जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर किंवा कृषी पंपांचे ‘आरसी बुक’ तपासूनच डिझेल देण्यास सुरुवात केली आहे. हाच पॅटर्न आता राज्यभरात प्रभावीपणे राबवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. खऱ्या शेतकऱ्यांना त्रास न देता केवळ गरजू लाभार्थ्यांपर्यंतच इंधन पोहोचावे, यासाठी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.


