Fake Note : बनावट नोटा तयार करणारे दोघे जेरबंद

Fake Note : बनावट नोटा तयार करणारे दोघे जेरबंद

0
Crime

Fake Note : श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव परिसरात बनावट नोटा (Fake Note) चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी सतर्कता (Alert) दाखवत पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांकडून सुमारे ५ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक दुचाकी हस्तगत केली.

हे देखील वाचा: मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती

दोघांवर गुन्हा दाखल (Fake Note)


याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अरविंद विठ्ठल जाधव यांच्या फिर्यादीवरून अजय मधुकर पुरके (वय ३०, रा. पिंपळगाव भोसले, ता.आर्वी जि. वर्धा) आणि अनिल रघुनाथ देसाई (वय ३३, रा.सातारा, हल्ली दोघे रा.जयभवानी नगर, कोथरूड, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कोळगाव परिसरात नगर दौंड रस्त्यावरील एका हॉटेलवर दोघांकडून पाण्याची बाटली विकत घेत बनावट नोट चलनात आणली. मात्र, हॉटेल चालकाला दिलेली नोट बनावट असल्याचे लक्षात येताच हॉटेल चालकाने दोघांचा पाठलाग केला असता ते तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या एका हॉटेलवर बनावट नोटा देऊन वस्तू विकत घेताना रंगेहाथ पकडले. याबाबत त्यांचेकडे अधिक चौकशी केली त्यांचेकडे बनावट नोटांची १००, २०० आणि ५०० रुपयांची बंडले आढळून आली. नागरिकांनी बेलवंडी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

नक्की वाचा: बापरे ! पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स ?

५ लाख ८० हजारांचे बनावट नोटांचे बंडल हस्तगत (Fake Note)

घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून ४० हजार रुपयांची दुचाकी तसेच ५ लाख ८० हजार रुपयांचे बनावट नोटांचे बंडल हस्तगत केले. याप्रकरणी त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे येथील कोथरूड परिसरात बनावट नोटा तयार केल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि त्यांच्या पथकाने कोथरूड येथील रूमवर जाऊन बनावट नोटा तयार करण्याचे प्रिंटर तसेच इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here