नगर : भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ‘फौजी’च्या (Fauzi Movie) टीमने चित्रपटाचे एक दमदार नवे पोस्टर रिलीज (New Poster Release) केले आहे. या पोस्टरमुळे ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्रभास हा भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवणारा अभिनेता आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवरील विक्रमी कमाईच्या जोरावर प्रभासने जगभरात चाहत्यांचा मोठा वर्ग निर्माण केला आहे. आपल्या अतुलनीय स्क्रीन प्रेझेन्स आणि प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर तो मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. अशातच आता हा सुपरस्टार आपल्या आगामी भव्य ऐतिहासिक ड्रामा ‘फौजी’साठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात प्रभास एका दमदार, तीव्र आणि अगदी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
नक्की वाचा : राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार?
पोस्टरमध्ये नेमकं काय? (Fauzi Movie)
प्रभासच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करत चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘फौजी’चे अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या नव्या पोस्टरमध्ये प्रभासचा एक आकर्षक व्हिंटेज लूक पाहायला मिळतो. यात एका सोनेरी नाण्यावर गणवेशातील सुपरस्टारची बाजूने दिसणारी प्रतिमा आहे आणि या नाण्याभोवती आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. पोस्टरवर “फाईल नंबर ०२५ वरून आज पडदा उठणार” असे लिहिले आहे. यासोबतच “एक अशी बटालियन, जी एकटीच लढते” ही दमदार टॅगलाइनही लक्ष वेधून घेते.
अवश्य वाचा : साईचरणी गुप्त दात्याकडून २७ लाखांची अनमोल भेट; संगमरवरी शिळांवर सोन्याच्या कोटिंगमध्ये कोरली साईबाबांची ११ वचने
चित्रपट कधी होणार रिलीज? (Fauzi Movie)
हनु राघवपुडी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘फौजी’ची निर्मिती मैत्री मूव्ही मेकर्सने केली असून, टी-सीरीज फिल्म्स प्रस्तुत करत आहे. नवीन येरनेनी, वाय. रविशंकर आणि भूषण कुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘फौजी’ हा चित्रपट ३ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



