Five arrested while preparing for a robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक; दोन गावठी कट्टे, काडतुसे आणि लक्झरी कारसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

Five arrested while preparing for a robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक; दोन गावठी कट्टे, काडतुसे आणि लक्झरी कारसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Five arrested while preparing for a robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक; दोन गावठी कट्टे, काडतुसे आणि लक्झरी कारसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
Five arrested while preparing for a robbery : दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक; दोन गावठी कट्टे, काडतुसे आणि लक्झरी कारसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

Five arrested while preparing for a robbery : नगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना (Five arrested while preparing for a robbery) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे (Country-made pistols), चार जिवंत काडतुसे, लोखंडी टॉमी, मिरची पावडर, सहा मोबाईल आणि दोन लक्झरी कार असा तब्बल 32 लाख 19 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 21 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. शाहरूख रज्जाक शेख (वय 34, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), इम्रान अन्वर पठाण (वय 23, रा. टाकळी, ता. कोपरगाव), तन्जीम नदिम शेख (वय 26, रा. मिलननगर, येवला), फिरोज चाँद शेख (वय 35, रा. ताजपार्क, येवला) आणि रेहान रौफ शेख (वय 30, रा. वॉर्ड क्रमांक 2, श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

दरोडा व जबरी चोरीच्या घटना रोखण्याच्या सूचना

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गोपनीय बातमीदाराकडून माहिती (Five arrested while preparing for a robbery)

हे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून पाच जण दोन काळ्या रंगाच्या विनाक्रमांक चारचाकी वाहनांसह गुरुदत्त मित्रमंडळ, लवणवाडी परिसरातील पाटीजवळ कच्च्या रस्त्याच्या आडोशाला थांबले असून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी अंधारात दोन काळ्या रंगाच्या कारजवळ पाच जण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता समाधानकारक माहिती न मिळाल्याने सर्वांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये शाहरूख रज्जाक शेख (वय 34, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), इम्रान अन्वर पठाण (वय 23, रा. टाकळी, ता. कोपरगाव), तन्जीम नदिम शेख (वय 26, रा. मिलननगर, येवला), फिरोज चाँद शेख (वय 35, रा. ताजपार्क, येवला) आणि रेहान रौफ शेख (वय 30, रा. वॉर्ड क्रमांक 2, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.

पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत पोलिसांना दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, लोखंडी टॉमी, मिरची पावडर आणि सहा मोबाईल मिळून आले. याशिवाय त्यांच्या ताब्यातील विनाक्रमांकाची दोन काळ्या रंगाच्या कारही जप्त करण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी शाहरूख शेख आणि इम्रान पठाण यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडील गावठी कट्टे व जिवंत काडतुसे आसिफ उर्फ आश्यू पठाण (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही, रा. वॉर्ड क्रमांक 2, श्रीरामपूर) आणि राजेंद्र भाऊसाहेब गांगुर्डे (रा. अशोकनगर फाटा, श्रीरामपूर) यांच्याकडून विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. हे दोघे सध्या फरार आहेत. शाहरूख शेख आणि इम्रान पठाण हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहरूखविरुद्ध श्रीरामपूर शहर, नारायणगाव, लोणी, श्रीरामपूर तालुका, नगर तालुका, शिर्डी, कॅम्प आणि कोपरगाव पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टसह विविध गुन्हे दाखल आहेत. तर इम्रान पठाण याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विजय पवार, सुनील पवार, बिरप्पा करमल, राहुल डोके, आजिनाथ पाखरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार, भगवान धुळे आणि सोनल भागवत यांच्या पथकाने केली.