MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

0
MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

मृद व जलसंधारण विभागातर्फे ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन

MAHA WALKATHON 2026 : अहिल्यानगर : माती आणि पाणी ही आपली अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा दिलेला संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी माती व पाणी संवर्धनाची लोकचळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (District Collector Dr. Pankaj Ashiya) यांनी केले.

राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या (Soil and Water Conservation Department) वतीने माती व पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘महा वॉकॅथॉन (MAHA WALKATHON 2026) – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया बोलत होते. यावेळी महापौर श्रीमती ज्योती गाडे, नगरसेवक श्री ऋग्वेध गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, उपवनसंरक्षक श्री सालविठ्ठल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुळीक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. खुरांगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी चित्रकला, निबंध तसेच वादविवाद स्पर्धेचे बक्षिस वितरण देखील यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की,

आज आपण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविला, तरच उद्याची पिढी सुरक्षित राहील. त्यामुळे माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी केले.

MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
MAHA WALKATHON 2026 : माती आणि पाणी संवर्धन ही काळाची गरज-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जलस्रोतांचे संरक्षण आणि मातीची धूप रोखण्याबाबत संदेश (MAHA WALKATHON 2026)

‘वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जलसंधारण, पाणी बचत, मृदसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहभागी नागरिकांनी माती व पाणी संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेत जनजागृती केली. पाण्याचा अपव्यय टाळणे, पावसाचे पाणी साठवणे, वृक्षलागवड करणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि मातीची धूप रोखणे याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘माती वाचवा, पाणी वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.