
‘Tiranga Rakhis’ sent to soldiers : राहुरी : देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या वीर जवानांप्रती (Brave Soldier) प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Zilla Parishad Primary School) शेणवडगांव (ता. राहुरी) येथील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने ‘तिरंगा राखी’ (‘Tiranga Rakhis’ sent to soldiers) तयार केली आहे. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सैनिक बंधूंना राखी पाठवून त्यांच्या शौर्याला मनापासून सलाम केला आहे.
सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी
राखी म्हणजे केवळ एक धागा नाही, तर आपुलकी, विश्वास आणि संरक्षणाचे नाते असते. याच भावनेतून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या सीमेवरील जवानांचे मनोधैर्य वाढवणाऱ्या ठरतील. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, सैनिकांप्रती आदर, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न शाळा प्रशासनाने केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जवानांना सलाम करणारा स्तुत्य उपक्रम (‘Tiranga Rakhis’ sent to soldiers)
“सीमेवर तुम्ही देशाचे रक्षण करता, आमच्या मनातील तिरंगा तुमच्यासाठी सदैव अभिमानाने फडकत राहील!” अशा भावना या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. भारतमातेच्या वीर जवानांना सलाम करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


