
Youth arrested with a country-made pistol : नगर : शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) परिसरात गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला (Youth arrested with a country-made pistol) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले. अनिल सिताराम सावंत (वय ३०, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. २० ऑगस्ट रोजी हे पथक शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अनिल सावंत हा गावठी कट्टा विक्रीसाठी एका हॉटेलवर येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत सावंत याला ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे जप्त (Youth arrested with a country-made pistol)
अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सावंत याने हा गावठी कट्टा आणि काडतुसे गणेश शहाराम शिंदे (रा. वळणपिंप्री, ता. राहुरी) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणातील गणेश शिंदे हा सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, अशोक लिपणे, भगवान सानप, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली.


