Fodder Transport : अहिल्यानगरमध्ये गरजेच्या निम्माच चारा; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पुढील दोन महिने बंदी

जिल्ह्यात चाऱ्याची मोठी कमतरता निर्माण होण्याची शक्यता

0
Fodder Transport : अहिल्यानगरमध्ये गरजेच्या निम्माच चारा; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पुढील दोन महिने बंदी
Fodder Transport : अहिल्यानगरमध्ये गरजेच्या निम्माच चारा; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पुढील दोन महिने बंदी

Fodder Transport : नगर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाई (Fodder Shortage) लक्षात घेता, जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा व कोरडा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टी.एम.आर.) जिल्ह्याबाहेर नेण्यास (Fodder Transport) पुढील दोन महिन्यांसाठी सक्त बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये १६ नोव्हेंबर २०२६ रोजी हे आदेश निर्गमित केले आहेत.

नक्की वाचा : श्रीगोंद्याचे क्रीडा संकुल १० वर्षांपासून बंद; मैदान व अभ्यासिका सुरू करण्यासाठी युवकांचा एल्गार

जिल्ह्यात चाऱ्याचा तुटवडा भासणार

जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सध्या अल्प चारा साठा शिल्लक आहे.
जिल्ह्यात १,७९,९८७ लहान जनावरे, १३,१९,९०६ मोठी जनावरे आणि १४,९९,८९३ शेळ्या व मेंढ्या असे एकूण २६,१५,७०६ पशुधन आहे.
टंचाईच्या निकषानुसार या सर्व पशुधनासाठी दरमहा ८,९५,२४३ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. मात्र, खरीप हंगामातील पेरणीनुसार जिल्ह्यात सध्या ४,५४,१८९ मेट्रिक टन इतकेच चारा उत्पादन झालेले आहे. दरमहा लागणाऱ्या चाऱ्याच्या तुलनेत उपलब्ध साठा पाहता, जिल्ह्यात ४,४१,०५४ मेट्रिक टन इतक्या चाऱ्याचा तुटवडा भासणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना (Fodder Transport)

जिल्ह्यात चाऱ्याची मोठी कमतरता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चारा वाहतूक बंदी लागू होती, ती आता या नवीन आदेशाच्या तारखेपासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी कायम राहणार आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सर्व तालुका व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.