Leopard : अहिल्यानगर शहरात बिबट्याचा वावर; संग्राम जगतापांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शहरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे

0
Leopard : अहिल्यानगर शहरात बिबट्याचा वावर; संग्राम जगतापांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Leopard : अहिल्यानगर शहरात बिबट्याचा वावर; संग्राम जगतापांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leopard : नगर : अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर परिसरात बिबट्याचा (Leopard) वावर असल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. सावेडी येथील गांगा उद्यान परिसर तसेच सीक्यूएव्ही (CQAV) परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाकडून (Forest Department) बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये गरजेच्या निम्माच चारा; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पुढील दोन महिने बंदी

नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक

शहराच्या नागरी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच कोणत्याही अफवा पसरवू नयेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू (Leopard)

या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. शहरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वनविभागाच्या सूचनांचे पालन करून स्वतःसह कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात येत आहे.