Fuel Price : पुन्हा इंधनवाढ; पेट्रोल ९१ पैशांनी तर डिझेल ९४ पैशांनी महागले

0
Fuel Price : पुन्हा इंधनवाढ; पेट्रोल ९१ पैशांनी तर डिझेल ९४ पैशांनी महागले
Fuel Price : पुन्हा इंधनवाढ; पेट्रोल ९१ पैशांनी तर डिझेल ९४ पैशांनी महागले

Fuel Price : नगर : अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात हे 91 पैशांनी तर डिझेलच्या दर 94 पैशांनी वाढ करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलच्या दर थेट 107.49 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.02 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : गावठी कट्टे बाळगणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई 

सरकारच्या उपाययोजनांकडे लक्ष

एकीकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध नाही, तर दुसरीकडे दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे . या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असून, भाजीपाला, धान्य आणि कडधान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच वाढू लागल्या आहेत. जर ही दरवाढ अशीच सुरू राहिली, तर नागरिकांना प्रचंड महागाईचा सामना करावा लागेल. सध्या बाजारात इंधनाचा साठा कमी असल्याचे सांगितले जात असल्याने, आता या गंभीर परिस्थितीवर सरकार काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की पहा : भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय?

इंधन आणखी महागणार (Fuel Price)

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम याचा होणार आहे. इंधन महाग होत असल्याने बस, टॅक्सी आणि वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जर कच्च्या तेलाच्या किमती वाढतच राहिल्या, तर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.