Gold medal:अकोले: शेती आणि मातीमध्ये घाम गाळून पारंपरिक चौकटीबाहेर जात आधुनिक शेती करणार्या इंदोरी येथील नवले कुटुंबातील ललित अच्युत नवले यांनी भाभा इंटरनॅशनल यूनिव्हर्सिटी केंद्रामध्ये न्यूक्लिअर मेडिसिनची पदवी प्राप्त करीत या विषयात विशेष सुवर्णपदक (Gold medal) मिळवले आहे. अतिशय संशोधनात्मक असणारा हा अभ्यासक्रम ललित यांनी पूर्ण करीत ग्रामीण भागातील मुलांपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
अवश्य वाचा- त्रालयात आता कार्यकर्त्यांची गर्दी चालणार नाही; नवे नियम कोणते?
न्यूक्लिअर मेडिसिन हा संशोधनात्मक अभ्यासक्रम केला पूर्ण (Gold medal)
डॉ. होमी भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई यांचा पदवीदान सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी भारत सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोदकुमार पॉल, परमाणू ऊर्जा विभागाचे सचिव डॉ. अजितकुमार मोहंती, होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती यू. कामाची मुदाली, डॉ. होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे डीन प्रो. ए. के. त्यागी यांच्या हस्ते ललित नवले यांनी संशोधनात्मकरीत्या न्यूक्लिअर मेडिसिन आणि मॉलिक्युलर इमेजिंग हा संशोधनात्मक अभ्यासक्रम पूर्ण करीत विशेष सुवर्णपदक मिळवले. विशेष म्हणजे संपूर्ण देशपातळीवर महाराष्ट्रातील फक्त दोन विद्यार्थ्यांनाच हे सुवर्णपदक मिळाले. ललित यांना टाटा मेमोरियल सेंटरचे डायरेक्टर प्रो. एस. गुप्ता, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डायरेक्टर प्रो.सी. एम. प्रमेश, अकॅडेमी डायरेक्टर प्रो. एस. लष्कर, एस. कुलकर्णी, विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. रंगराजन, भक्ती शेटे, डॉ. आशिष झा, डॉ. स्नेहा मिथुन यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.



