
Headmaster bites eight-year-old student : नगर : अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेच्या (English-medium school) मुख्याध्यापकाने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या हाताचा चावा घेऊन (Headmaster bites eight-year-old student) त्यानंतर गळा दाबून जवळपास 20 सेकंद उचलून धरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे विरोधात बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडणे कसे करतात ते दाखवतो म्हणून गळा धरून उचलले
आठ वर्षीय विद्यार्थी शाळेत गेले असताना त्याच्या वर्गातील वर्ग मित्रांचे आपसात भांडण सुरू होते. याबाबत त्या आठ वर्षे विद्यार्थ्यांने वर्ग शिक्षिकेला सांगितले त्यावर वर्गशिक्षिकेने शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवून घेतले. मुख्याध्यापक आल्यानंतर त्यांनी जे विद्यार्थी आपसात भांडण करत होते त्यांचे कान पीरगाळले आणि भांडणे कसे करतात हे मी तुम्हाला दाखवतो असे म्हणून त्या आठ वर्षीय मुलाचा गळा धरून वर उचलले व तोंडाने एक ते वीस पर्यंत आकडे मोजले, त्यानंतर खाली उतरवून त्या मुलाच्या हाताचा चावा घेतला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चुकीने घडल्याचे सांगितले (Headmaster bites eight-year-old student)
ही घटना घरी गेल्यानंतर घरच्यांच्या लक्षात आली त्यावर त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकाला फोन करून या घटनेबाबत विचारले असता मुख्याध्यापकाने माझ्याकडून चुकीने ही घटना झाली मी लेखी पत्र पाठवून माफी मागतो मला तुमचा पत्ता द्या असेही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर सांगितले. मात्र त्या आठ वर्षीय बालकाचा असा छळ करणे हा मोठा अपराध आहे, अशा मुख्याध्यापकाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी त्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचे पालक सोनल शेळके यांनी केली आहे.


