HSRP Number Plate : अहिल्यानगर शहरात HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यां विरोधात धडक कारवाई

HSRP Number Plate : अहिल्यानगर शहरात HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यां विरोधात धडक कारवाई

0
HSRP Number Plate : अहिल्यानगर शहरात HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यां विरोधात धडक कारवाई
HSRP Number Plate : अहिल्यानगर शहरात HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यां विरोधात धडक कारवाई

HSRP Number Plate : परिवहन मंडळाने (Transport Department) दिलेल्या कडक आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आता पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या आदेशानुसार, विना-एचएसआरपी (HSRP – हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) फिरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध अहिल्यानगर शहरात आजपासून अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील मुख्य चांदणी चौक परिसरात आरटीओने थेट रस्त्यावर उतरून या कारवाईला धडाक्यात सुरुवात केली.

मोठ्या फौजफाट्यासह चांदणी चौकात कारवाई

परिवहन मंडळाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी आरटीओचे वरिष्ठ अधिकारी स्वतः मोठ्या फौजफाट्यासह चांदणी चौकात उपस्थित होते. शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, तसेच अद्यापही जुन्या किंवा फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या शेकडो वाहनांची जागेवरच कसून तपासणी करण्यात आली आणि दंडात्मक बडगा उगारण्यात आला. आरटीओच्या या अचानक आणि आक्रमक कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. परिवहन मंडळाच्या आदेशानुसार ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र गतीने सुरू राहणार असून, वाहनधारकांनी तातडीने एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

HSRP Number Plate : अहिल्यानगर शहरात HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यां विरोधात धडक कारवाई
HSRP Number Plate : अहिल्यानगर शहरात HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यां विरोधात धडक कारवाई

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्या पथकाने केली कारवाई (HSRP Number Plate)

ही कारवाई आरटीओ चे अधिकारी रूपाली खडसे, प्रणिता मुनफन, प्राजक्ता खोमणे, महेश भोजने, लक्ष्मण थोरात तसेच वाहन चालक दीपक ज्ञानदेव खैरनार, छबुराव सूर्यभान भिसे, राजाराम राठोड यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here