Ideal Teacher Award : भालगाव शाळेतील शिक्षक राहुल आठरे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

एनसीइआरटी पोर्टलवर देखील मार्गदर्शक व्हिडीओ प्रसिद्ध

0
Ideal Teacher Award : भालगाव शाळेतील शिक्षक राहुल आठरे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Ideal Teacher Award : भालगाव शाळेतील शिक्षक राहुल आठरे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Ideal Teacher Award : नेवासा : जिल्हा परिषद अहिल्यानगर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे (Primary Education Department) नेवासे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भालगाव येथील उपक्रमशील पदवीधर शिक्षक राहुल अशोक आठरे यांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ (Ideal Teacher Award) राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) ,शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृह प्रवरानगर येथील झालेल्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

नक्की वाचा : मनोज जरांगे यांनी उपचारांना नकार देऊन टोकाचे पाऊल उचलू नये – राधाकृष्ण विखे पाटील

दोन केंद्र प्रमुख पुरस्कार देऊन सन्मानित

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,शिर्डी नगराध्यक्ष जयश्री थोरात, डॉ. भास्करराव खर्डे, प्रकल्प संचालक मंजुषा देवकर, योजना शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे आदी मान्यवरांनी आठरे यांच्यासह प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक व जिल्ह्यातील दोन केंद्र प्रमुख यांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विखे पाटील म्हणाले की (Ideal Teacher Award)

पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्तविक मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. यावेळी राज्यात अग्रभागी असलेल्या शिक्षण विभाग अहिल्यानगर ची कामगिरी व पुरस्कार निवड प्रक्रिया आपल्या मनोगतातून व्यक्त केली.यावेळी अध्यक्षस्थानी असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनाचा पाया असून तो भक्कम झाला पाहिजे.शिक्षकांनी बदलत्या काळात वास्तव्याचे भान ठेवून तळागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह शिक्षण देण्यासाठी  प्रयत्नशील राहावे. यावेळी त्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे अभिनंदन केले.

एनसीइआरटी पोर्टलवर देखील मार्गदर्शक व्हिडीओ प्रसिद्ध

आठरे यांचे  शैक्षणिक व सामाजिक काम राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरत असून त्यांनी  ई बालभारती येथून आभासी पध्दतीने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कोरोना काळात शासनाच्या शिकू आनंदे उपक्रमात यशस्वीपणे विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला आहे.पी.एम.ई विद्या चैनल, दीक्षा व्हिडीओ निर्मिती, निपुण भारत अँप, एनसीइआरटी पोर्टलवर देखील मार्गदर्शक व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहे.    

सामाजिक व शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल

मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत नेवासा मुले शाळेत स्मार्ट क्लास निर्मिती, भालगाव शाळेत भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर विशेष भर देत आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी व शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याचे सातत्याने कार्य करत असून त्यांचे आज अखेर विद्यार्थी राष्‍ट्रीय व राज्‍यस्‍तरीय शैक्षणिक स्‍पर्धां, उपक्रमात यशस्वी झाले आहे. समग्र शिक्षा महाराष्ट्र मुंबईच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांची उपक्रम झळकले आहेत.त्यांच्या पर्यावरण संवर्धन उपक्रम, सामाजिक व शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल घेत या वर्षीचा नेवासा तालुक्यातून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.