Illegal excavation : ‘दिल्ली वेस’ परिसरातील कथित बेकायदेशीर खोदकामामुळे २५० वर्षे जुन्या वारसा वास्तूला धोका; संरक्षणासाठी शिवदुर्गचे तहसीलदारांना निवेदन

Illegal excavation : ‘दिल्ली वेस’ परिसरातील कथित बेकायदेशीर खोदकामामुळे २५० वर्षे जुन्या वारसा वास्तूला धोका; संरक्षणासाठी शिवदुर्गचे तहसीलदारांना निवेदन

0
Illegal excavation : ‘दिल्ली वेस’ परिसरातील कथित बेकायदेशीर खोदकामामुळे २५० वर्षे जुन्या वारसा वास्तूला धोका; संरक्षणासाठी शिवदुर्गचे तहसीलदारांना निवेदन
Illegal excavation : ‘दिल्ली वेस’ परिसरातील कथित बेकायदेशीर खोदकामामुळे २५० वर्षे जुन्या वारसा वास्तूला धोका; संरक्षणासाठी शिवदुर्गचे तहसीलदारांना निवेदन

Illegal excavation : नगर : श्रीगोंदा शहरातील ऐतिहासिक ‘दिल्ली वेस’ परिसरात जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर खोदकामामुळे सुमारे २५० वर्षे जुन्या वारसा वास्तूच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचा आरोप करत, हे खोदकाम तातडीने थांबवून परिसर पूर्ववत करण्याची मागणी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आमदार विक्रमसिंह पाचपुते, श्रीगोंदा तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तसेच पुरातत्त्व विभाग, नाशिक यांनाही पाठविण्यात आली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

निवेदनानुसार, दिल्ली वेस परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले आहे. या खोदकामामुळे वेशीच्या पश्चिमेकडील भव्य बुरुजाच्या पायथ्याला धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास वारसा वास्तूचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन गेल्या पाच वर्षांपासून दिल्ली वेसचे जतन, संवर्धन आणि तिला वारसा स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. अशा परिस्थितीत खोदकामाची घटना समोर आल्याने इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी (Illegal excavation)

निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने १९८२ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार असंरक्षित पुरातन स्मारकांच्या १०० फूट परिसरात कोणतेही नवीन बांधकाम अथवा खोदकाम करण्यास प्रतिबंध आहे. असे असतानाही संबंधित परिसरात खोदकाम झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, खोदकाम करणाऱ्या अज्ञात व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर पुरातन वारसा वास्तूचे नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने केली आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल

पानिपत युद्ध आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार (Illegal excavation)

दिल्ली वेस ही केवळ श्रीगोंदा शहराची ओळख नसून महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण वारसा असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले, श्रीगोंद्याचे पाटील महादजी शिंदे तसेच पानिपत युद्ध आणि दिल्ली विजयाशी संबंधित ऐतिहासिक घटनांची ही वास्तू साक्षीदार असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण घटनेची तातडीने चौकशी करून दिल्ली वेसचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने प्रशासनाकडे केली आहे.