
Illegal Money Lending : अहिल्यानगर: जिल्ह्यात अवैध सावकारी (Illegal Money Lending) करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या २१ जणांवर एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी यासंदर्भातील तक्रार अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे कडक आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या (Maharashtra Money-Lending Act) अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. आशिया यांनी केल्या सूचना
यावेळी सावकारांचे जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे, तालुका कार्यालयाचे सहायक निबंधक उपस्थित होते. या बैठकीमध्ये डॉ. आशिया यांनी सूचना केल्या. आशिया म्हणाले, गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी हे त्यांना आवश्यक असणाऱ्या कर्जाची रक्कम अवैध सावकारांकडून घेऊ नये. सहकार खात्याकडून परवाना दिलेल्या परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून अवैध सावकारीला पायबंद बसण्यास मदत होईल, तसेच जे कोणी अवैध सावकारीमधून कर्जदारांना जादाचे व्याज आकारून त्रास देत असेल अशा व्यक्तीविरुद्ध सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संबंधित २० गुन्हे दाखल (Illegal Money Lending)
कशी आहे व्याजाची आकारणी परवानाधारक सावकारास शेतकऱ्यांकडून तारणी कर्जास ९ टक्के व विनातारणी कर्जास १२ टक्के, तसेच बिगर शेतकरी व्यक्तींकडून तारणी कर्जास १५ टक्के व विनातारणी कर्जास १८ टक्के व्याजदर शासनाने ठरवून दिले आहेत. २१ सावकारांवर कारवाई बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या २१ जणांवर संबंधित २० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत २० अपिलामध्ये २५ हेक्टर १५.५ आर जमिनीचे क्षेत्र व २२०० चौ. फूट बांधकाम तालुक्यातील विविध शेतकऱ्यांना परत करण्याबाबतचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.


